गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ असा अर्ज करा आणि पक्का गोठा बांधण्यासाठी मिळवा अनुदान. Gai Gota Anudan Yojana 2023

 गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ असा अर्ज करा आणि पक्का गोठा बांधण्यासाठी मिळवा अनुदान. 




आपल्या महाराष्ट्र शासनाने  गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. ह्या योजनेंतर्गत, गाय किंवा म्हैस ह्यांच्यासाठीचा पक्का गोठा बांधून मिळेल. ह्या गोठ्यासाठी 77,188 रुपये सहाय्य रक्कम सरकारकडून दिली जाईल. जर तुमच्या गायी म्हशी असतील किंवा जर तुम्हाला भविष्यात गायी म्हशी पाळायच्या असतील तर तुम्हाला महाराष्ट्र गाय गोठा अनुदानासाठी अर्ज डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. योजनेच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा.


योजनेचे तपशील 

महाराष्ट्र गाय गोठा अनुदान 2023

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ फॉर्म PDF

योजना शरद पवार गाय गोठा अनुदान योजना

महाराष्ट्र राज्य सुरू केले

विभाग पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग

नफा रु 77,188 अनुदान रक्कम

अधिकृत वेबसाइट mahamesh.co.in


अर्ज प्रक्रिया नोंदणी ही ऑफलाइन असेल.वरील वेबसाईट वर जाऊन अर्जाविषयी माहिती मिळेल. 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हे पण वाचा 👇

मोबाईल वरून एक मिनिटांमध्ये पर्सनल लोन किंवा कर्ज मिळवा पाच हजार रुपये पासून 50 हजार पर्यंत अर्जंट मध्ये मिळवा.

                 👉 त्यासाठी येथे क्लिक करा 👈

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


ह्या योजनेतून अशा प्रकारे खर्चाची विभागणी असू शकते

खर्च केलेल्या गायी आणि म्हशी गोठा शेल संगोपन शेड कुक्कुट पालन शेड नडेप कंपोस्टिंग

अकुशल खर्च रु.6,188/- ४,२८४/- ४,७६०/- ४,०४६/-

कार्यक्षम खर्च रु.71,000/- ४५,०००/-रु. ४५,०००/- ६,४९१/-

एकूण ७७,१८८/-रु. ४९,२८४/- ४९,७६०/- १०,५३७/-


गाय गोठा अनुदान योजना कशासाठी? 

गुरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही गोपालन योजना महाराष्ट्र 2023 ही एकमेव योजना राबविण्यात येणार आहे.पहिली गोष्ट म्हणजे जनावरांसाठी असलेली गोठ्याची अस्वच्छता ज्यामुळे जनावरांना विविध आजार होतात आणि जनावरे विद्रूप होऊन शरीराच्या खालच्या बाजूला जखमी होतात. किंवा जेथे गोठाच नसल्यामुळे  मूत्र आणि शेण बाहेर पसरतं. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे हाच योजनेचा प्रमुख उद्देदेश आहे. 


आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैशी असतात कारण गाई आणि म्हशी पालन हा शेतकऱ्यांना पारंपरिक आणि शेतीसाठी जोडव्यवसाय आहे. परंतु गाई-म्हशींसाठी कायमची पक्की बांधलेली जागा ग्रामीण भागात  उपलब्ध नसते, जनावरांना ठेवलेली जागा म्हणजे शेताच्या कोपऱ्यात झाडाला बांधणे. ही जागा जनावरासांठी त्रासदायक असते. 


म्हणूनच ह्या योजेने नुसार, स्वत:ची जमीन व इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी गोठा अनुदान योजनेसाठी पात्र असतील. ज्यामुळे चांगली गुरे बांधली जातील व मूत्र साठवण टाक्या बांधल्या जातील. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येणार आहे. ह्यासाठी पूर्वीची ६ गुरांची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे किंवा त्याकरिता एक गोठा आणि त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ छाया पतित म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट गोठा बांधणी अनुदान राहील. 


गाय गोठा अनुदान योजना 2023


केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा.महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana गाय गोठा अनुदान योजना आहे. ह्या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.


आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाची जागा नसते.  त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्याच्यासमोर  जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना ही उपकारक ठरणार आहे. 


ह्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.


Gai Gotha Anudan Yojana राबविल्याने होणार एक फायदा म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नसतात, परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.


शेतकरी बांधवांचा विचार करूनच आम्ही गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती ह्या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व ह्या योजनेचा लाभ मिळवा. जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना ह्या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचा हा लेख त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


आपण शासनाच्या विविध सरकारी योजना आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण गाय गोठा अनुदान योजना काय आहे, Gai Gotha Anudan Yojana उद्दिष्ट काय आहे, Gai Gotha Anudan Yojana Maharashtra वैशिष्ट्य काय आहेत, Maharashtra Gai Gotha Anudan Yojana फायदे काय आहेत, Gai Gotha Yojana पात्रता काय आहे, Gai Gotha Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Gai Gotha Anudan Yojana अर्ज करायची पद्धत, गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे

शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.

शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.

नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.


गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये

महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.

ह्या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.


ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.


गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या मदतीने जमा करण्यात येते.


गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी 

योजना या नावाने सुद्धा प्रचलित आहे. .


गाय गोठा अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्याचं 

जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यात तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हायला मदत होईल.



ग्रामीण भागातील गोठे कच्चे बांधले जातात.जनावरांचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ते गोठ्यात इतरत्र पडलेले असते.तसेच पावसाळ्यात जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते.याच जागेत जनावरे बसत असल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होतात.


त्यामुळे काही जनावरांच्या सडाला रोग होऊन होऊन हजारो रुपये औषधावर जातात. ह्यात गाई म्हशींची कास निकामी होऊ शकते. घाणीमुळे जनावरांच्या खालील बाजूस जखमा देखील होतात. बऱ्याच ठिकाणी गोठ्यामध्ये जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी सुद्धा बांधलेली नसतात. जनावरांना  तिथेच झाडाखाली चारा टाकला जातो या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्यामुळे जनावरे तो चारा खात नाहीत आणि चारा वाया जातो.


गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा साठा न करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते .जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील टाकीत एकत्र जमा करता येईल.  शेण आणि मूत्राचा वापर शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.तसेच गव्हाणी बांधून गुरांना चार नीट खाता येईल. .


गाय गोठा योजेनतंर्गत काय लाभ मिळतील? 

ह्या सरकारी योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. 

ह्या ग्रामीण योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान मिळेल.

६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान मिळेल. 

१२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.

गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल

गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.

जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.


सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग केलं जाईल. 



शेळी पालन शेड  बांधण्यासाठी अनुदान 

शेळीला गरीबाची गाय समजली जाते.शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे पारंपरिक आणि महत्वाचे साधन आहे.अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. 


ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंब पैसै नसल्यामुळे शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत.चांगल्या निवाऱ्या अभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे संसर्गजन्य, जंतजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढया होतात. ह्याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटूंबाला नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधण्यासाठी अनुदान दिलं जात आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post